नमस्कार शेतकरी मित्रांनो….!!
आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्र शासनाने कुसुम सोलार योजना (२.०)-2024 नुकतीच जाहीर केली आहे.
प्रधानमंत्री कुसुम सोलर “Kusum Solar Yojana” योजनेसाठी १७ मे २०२३ पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरु झाले असून. मित्रांनो तुम्ही अर्ज करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करू शकता.
अर्ज भरण्या अगोदर तुमचं गाव Safe Villege च्या यादी मध्ये आहे याची खात्री नक्की करून घ्या.
नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला १०० किंवा १५ रु ऑनलाईन शुल्क लागणार आहे. शेतकरी “मोबाईल” वरून किंवा जवळच्या ऑनलाईन “आपले सरकार सेवा केंद्र” याठिकाणी आपला अर्ज भरू शकतात.
• महत्वाचे : अर्ज भरताना सर्व माहिती हि बरोबरच भरावी. एकदा भरलेली माहिती अर्ज Submit/सबमिट केल्यानंतर पुन्हा दुरुस्त करती येणार नाही.
त्यामुळे आपण १००% खरीच माहिती भरत आहोत याची खात्री करून घ्या.
मोबाईलवरून अर्ज कसा करायचा
- नोंदणीसाठी खालीलप्रमाणे माहिती भरावी.
उजव्या बाजूला तुम्हाला एक Safe Village List हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून आपल्या गावाचे नाव यादीत आहे किंवा नाही हे बघून घ्या. यादीमध्ये नाव असेल तर आपण “Diesel Pump User” या पर्यायामध्ये “No” हा पर्याय निवडू शकता. परंतु यादीमध्ये नाव नसेल तर त्याठिकाणी “Yes” पर्याय निवडून अर्ज भरण्यास सुरुवात करू शकता.
kusum.mahaurja.com login
अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे.
१) आधार कार्ड (PDF,JPG)
२) बॅक पासबुक (PDF,JPG)
३) ७/१२ झेरॉक्स
५) पासपोर्ट फोटो
मोबाइल नंबर
- तुमचा आधार नंबर, जिल्हा, तालुका, गाव आणि मोबाईल नंबर
त्याच बरोबर कास्ट कॅटेगिरी मध्ये जात प्रवर्ग निवडून पेमेंट फॉर ऑनलाइन एप्लीकेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर रुपये 15 किंवा 100 रुपये शुल्क भरावे लागेल.
- शुल्क भरताना शिपिंग माहिती भरावी त्यानंतर आपल्या जिल्ह्यात किती कोटा उपलब्ध आहे याची माहिती दिसेल कोटा उपलब्ध असल्यानंतरच पुढील प्रक्रिया करा.
- आपण कशाद्वारे शुल्क भरणार तो ऑप्शन निवडून शुल्क भरा शुल्क भरल्यानंतर पुन्हा तुमच्यासमोर सुरुवातीचे पेज ओपन होईल.
- पुन्हा सुरुवातीला भरलेली माहिती त्या पेजवर भरा आणि पेमेंट फॉर ऑनलाइन एप्लीकेशन बटन वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला पुन्हा शुल्क भरायचे नाही.
- कोटा उपलब्ध आहे समजल्यानंतर प्रोसिडवर क्लिक करा नंतर नवीन पेज उघडेल त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड नंबर तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडून तुमच्या शेताचा गट नंबर टाकायचा आहे.
लक्षात असू द्या गट नंबर चुकीचा टाकू नका केवळ चार वेळेसच तुम्हाला चुकीचा गट नंबर टाकता येईल त्यानंतर तुम्हाला पुन्हा शंभर रुपये भरावे लागतील.
- आपले नाव गट नंबर मध्ये बरोबर आहे हे टाकल्यानंतर इतर माहिती भरून “सबमिट एप्लीकेशन” या बटनवर क्लिक करा.
थोड्यावेळानंतर आपल्या मोबाईल नंबर वर एक सहा अंकी ओटीपी येईल तो ओटीपी पुढील ओपन झालेल्या पेज वरती टाकावा त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती एक आणखीन मेसेज त्यामध्ये तुम्हाला युजरनेम व पासवर्ड मिळेल तो महत्त्वाचा आहे तो लिहून ठेवा.
युजरनेम आणि पासवर्ड मिळाल्यानंतर येथे क्लिक करा
- या साईट वरती तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे.
पहिल्या दोन स्टेपमध्ये तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही. त्यानंतरच्या स्टेप मधील माहिती भरायची ती खालील प्रमाणे आहे.
- नवीन किंवा बदली डिझेल पंपाची विनंती.
- अर्जदाराची वैयक्तिक व जमीन विषयक माहिती.
- अर्जदाराचा निवासी पत्ता.
- जलस्तोत्र आणि सिंचन माहिती.
- पिकांची माहिती.
- आवश्यक पंपाची माहिती.
- बँकेची माहिती.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर अटी आणि शर्ती याला टिकमार्क करा त्यानंतर “सबमिट बटन” वरती क्लिक करा.
अभिनंदन आपला अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे..!
Pingback: Find your Name in Voter list-2024/मतदार यादीत आपले नाव तपासा. - सरकारीGR.in