महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील राशन धान्य घेणाऱ्या सर्व ग्राहकांना आता ई-के वाय सी करणे बंधनकारक केले आहे.केवायसी केली नाही तर तुमचे धान्य मिळण्यास येणाऱ्या काळात अडचणी येऊ शकतात किंवा आपले रेशन धान्य मिळणे बंद देखील होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक राशन कार्ड धारकाला रेशन कार्ड ची इ केवायसी करावी लागणार ही केवायसी करण्यासाठी राशन कार्ड मधील प्रत्येक व्यक्तीचे (घरातील प्रत्येकाचे) आधार कार्ड लागणार आहे.
राशन साठी ई-केवायसी कुठे करावी- राशन कार्ड धारकाच्या सर्व सदस्यांना आपल्या जवळील स्वस्त धान्य दुकानदाराकडे जाऊन रेशन कार्डची इकेवायसी करावी लागणार आहे इ केवायसी करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याचे आधार कार्ड व स्वतः तो लाभार्थी दुकानांमध्ये जाणे आवश्यक आहे.
Pingback: What is Dinga Dinga Virus ? 2024 :काय आहे डिंगा डिंगा आजार - सरकारीGR.in