नमस्कार मित्रांनो…!!
सिटीसर्वे उतारा कसा काढायचा यासाठी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे.नागरिकांसाठी डिजिटल सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अनेक कामे ही ऑनलाइन अगदी आपल्या मोबाईल वरून सुद्धा घरबसल्या करता येत आहेत त्याचबरोबर आपल्याला सिटी सर्वे उतारा म्हणजेच सिटीसर्वे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन / डिजिटल प्रॉपर्टी कार्ड मोबाईल वरून सुद्धा काढता येत आहे.
सिटी सर्वे उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही घरबसल्या अगदी मोबाईल वरून काही मिनिटांमध्ये आपण डिजिटल सिटी सर्वे उतारा म्हणजेच डिजिटल प्रॉपर्टी कार्ड काढू शकता.डिजिटल प्रॉपर्टी कार्ड काढणे काढण्यासाठी तुम्हाला सिटी सर्वे नंबर माहित असायला पाहिजे परंतु सिटी सर्वे नंबर हा आपण ऑनलाइन सुद्धा काढू शकतो.
डिजिटल सहीची सिटी सर्वे उतारात तसेच बिगर सहीचा उतारा कसा काढायचा आणि सिटीसर्वे उतारा बद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
सिटीसर्वे उतारा डिजिटल प्रॉपर्टी कार्ड बद्दल माहिती डिजिटल सहीचा उतारा किंवा डिजिटल साइन प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी काही शुल्क आकारले जाते.ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागातील ही शुल्क वेगवेगळ्या असू शकतात शहरी भागासाठी हे शुल्क थोडी जास्त असू शकतात नागरिकांसाठी शासनाने आता सिटी सर्वे नंबर शोधण्यासाठी किंवा पाहण्यासाठी एक नवीन पोर्टल तयार केली आहे. आपण आपल्या नावावर अडनावावर किंवा वडिलांच्या नावावर या तीन पर्याय द्वारे आपण सिटीसर्वे नंबर शोधू शकतो.
तुम्हाला जर सिटी सर्वे नंबर माहिती नसेल तर खालील प्रमाणे प्रोसेस करा खालील स्टेप नुसार आपण आपला सिटी सर्वे नंबर शोधू शकता. तसेच विना स्वाक्षरी सिटी सर्वे उतारा मोबाईल वरून काढू शकता.अगदी मोफत त्यासाठी कोणतीही शुल्क भरावे लागणार नाही.
सिटी सर्वे नंबर शोधण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.
- सुरुवातीला मोबाईल मध्ये ही वेबसाईट क्रोम ब्राउजर मध्ये ओपन करा. त्यानंतर उजव्या बाजूला वरती क्लिक करायचे आहे आणि डेस्कटॉप मोड वरती क्लिक करा. संपूर्ण साईट ही कम्प्युटरमध्ये जशी दिसते तशी तुमच्या मोबाईल मध्ये दिसेल.
- सर्वप्रथम आपला विभाग निवडून गो वर क्लिक करा.क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्या ठिकाणी सर्वात आधी ७/१२, ८ अ आणि मालमत्ता पत्रक हे तीन पर्याय दिसतील त्यामधून तिसरा मालमत्ता पत्रका पर्याय निवडायचा आहे.
- आपला जिल्हा तालुका आणि गाव निवडावे आपल्या आपल्याला सिटी सर्वे नंबर शोधायचे आहे म्हणून आपण नावावरून नंबर काढणार आहोत पहिले आपले नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव हे तीन ऑप्शन्स पर्याय पाहायला मिळतील.नाव टाकल्यानंतर शोधा या बटन वर क्लिक करावे नंतर त्या गावातील तुमच्या नावाशी जुळणारी सर्व नावांची यादी दिसेल त्यामध्ये आपले नाव निवडावे.
- मालमत्ता पत्रक पहा या बटनवर क्लिक करा पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये कॅपच्या कोड टाकून व्हेरिफाय करायचे आहे.
- तुमचा सिटी सर्वे जागेचा उतारा मोबाईल मध्ये पाहायला मिळेल त्या उतारा मधील नगर भूमापन क्रमांक म्हणजे तुमचा सिटी सर्वे नंबर असतो.
सिटी सर्वे उतारा म्हणजे काय प्रॉपर्टी कार्ड प्रॉपर्टी कार्ड मालमत्ता पत्रक यालाच आपण सिटीसर्वे उतारा असे म्हणतो.