वयक्तिक आणि सामूहिक शेततळे-2023

वयक्तिक आणि सामूहिक शेततळे-2023

वयक्तिक शेततळे अनुदान योजना- २०२३

आणि

सामूहिक शेततळे योजना- २०२३

नमस्कार शेतकरी मित्रांनो…!

                    १) वयक्तिक शेततळे अनुदान योजना-२०२३ :- शेती म्हटलं की त्यासाठी लागणारी पाण्याचे स्त्रोत अत्यंत गरजेचे असतात.शेतीमध्ये जर एखादे पीक घ्यायचे असेल तर सर्वप्रथम आपण आपल्याकडे उपलब्ध होणारे पाणी यावर बरीचशी पिके घ्यायची ठरवतो. आपल्या पावसाळ्यामध्ये शक्यतो विहीर ,बोरवेल ,कॅनॉल किंवा वडा इत्यादी मध्ये पाण्याची कमतरता अजिबात भासत नाही,परंतु हिवाळ्यामध्ये हळूहळू पाण्याची कमतरता भासते पिकाला जर वेळेवर पाणी नाही मिळाले तर उत्पन्न कमी निघू शकते कधी कधी तर आलेले पीक हातातून जाऊ शकते. मात्र उन्हाळ्यामध्ये तर काही शेतकरी पिक घेऊच शकत नाहीत कारण उन्हाळ्यात विहीर बोरवेल यामध्ये पाणी कमी होऊ लागते परंतु शेतकऱ्याने जर आपल्या शेतामध्ये शेततळे केले तर त्याला शेततळ्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणूनच महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना शेततळे करण्यासाठी अनुदान देते तसेच शेततळ्याचे उत्तरीकरण (गाळ काढण्यासाठी) सुद्धा अनुदान देत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना शेततळे करण्याकरिता नक्कीच फायदा होणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावे किमान 0.60 हेक्टर आर म्हणजेच दीड एकर क्षेत्र असणे गरजेचे आहे.

या ठिकाणी तुम्हाला शेततळे योजनेबद्दल माहिती तसेच अर्ज करण्याची आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कुठे करावा त्याची प्रोसेस काय आहे याची संपूर्ण माहिती दिली जाईल. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे खालील कागदपत्र असणे अत्यंत गरजेचे आहे.

शेतकरी वैयक्तिक शेततळे करिता सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता तसेच सामूहिक शेततळे करीता सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतात.

शेततळे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

  1. आधार कार्ड
  2. आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते पासबुक
  3. जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गात असल्यास)
  4. मोबाईल नंबर
  5. सातबारा आठ अ उतारा
  6. पॅन कार्ड (असेल तर)

शेततळ्यासाठी अनुदान आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.

२) सामूहिक शेततळे योजना

शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे योजना करिता ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

या योजनेबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

सामूहिक शेततळे हे शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना अंतर्गत लाभ दिला जातो सामूहिक शेततळे योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करताना शेतकरी गट नोंदणी करावी लागते सामूहिक शेततळे योजनेसाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज भरावा लागणार आहे मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन अर्ज करावा लागत असे. मात्र आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी शेतकरी पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे ही सुविधा पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही.

सामूहिक शेततळे योजना अनुदान योजना 2023

सामूहिक शेततळे या घटकासाठी शेतकऱ्यांना अर्ज भरताना महाडीबीटी पोर्टल वरती शेतकरी गट म्हणून नोंदणी करावी लागेल तसेच त्या शेतकऱ्याकडे फुले,फळे,भाजीपाला,मसाला पिके इत्यादी पिके असणे अत्यंत गरजेचे आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • बँक खाते झेरॉक्स
  • ७/१२,८ अ उतारा
  • जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवागातील असल्यास)
  • मोबाईल नंबर
  • हमीपत्र

सामूहिक शेततळ्याकरिता अनुदान किती मिळणार आहे.

  • 34*34*4.70 आकारमान असल्यास ३ लाख 39 हजार पर्यंत अनुदान मिळू शकते.
  • 24*24*4 आकारमान असल्यास १ लाख 75 हजार रुपये पर्यंत अनुदानाचा लाभ होऊ शकतो.

लाभार्थी शेतकऱ्याला पूर्व सम्मती पत्र मिळाल्याशिवाय काम सुरू करू नये.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *