नमस्कार शेतकरी मित्रांनो….!
खास तुमच्यासाठी बियाणे खरेदी, औषधे खरेदी, खते खरेदी, इत्यादी खरेदीसाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करायचे ते नक्की वाचा.
महाडीबीटी पोर्टल अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे सुद्धा दिले जातात किंवा बियाणांची खरेदीसाठी अनुदान सुद्धा दिले जाते या योजनांमुळे साहजिकच शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. अश्या अनेक योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही सर्व अर्ज हे ऑनलाईन भरता येऊ शकतात.
शेतकऱ्यांना बियाणे हवे असतील त्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करणे गरजेचे आहे.
अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे आवश्यक असलेली कागदपत्रे
१) आधार कार्ड झेरॉक्स
२) बँक खाते पासबुक झेरॉक्स
३) शेत जमिनीचा ७/१२ आणि ८“अ” उतारा
वरील कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
बियाणे अनुदान योजना 2023 शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
तरी इच्छुक शेतकरी मित्रांनो आपण उडीद, बाजरी, साळ(भात),मूग, तुर, मका, सोयाबीन इत्यादी बियाणांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल वरती “शेतकरी योजना” या स्वतंत्र पर्यायांमध्ये बियाणे हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
शेतकऱ्यांना बियाणासाठी आपल्या मोबाईल वरून अर्ज करता येणार आहे. शेतकरी MAHADBTपोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्र यांच्या मदतीने शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात.