नमस्कार शेतकरी मित्रांनो…!
आनंदाची बातमी अशी आहे कि, नवीन ट्रॅक्टर साठी ऑनलाइन फॉर्म भरणे सुरु झाले आहेत.
ट्रॅक्टर अनुदान साठी अर्ज कुठे करावा कागदपत्रे कोणती लागतील अनुदान किती मिळेल याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
ट्रॅक्टर अनुदान योजना 2023 आजकालची शेती म्हटलं की मशागतीसाठी ट्रॅक्टर हे अत्यंत गरजेचे आहे. आपण काही काळापूर्वी बैलाच्या साह्याने शेतीची संपूर्ण मशागत करत होतो.पण अलीकडच्या काळामध्ये ट्रॅक्टर हा खूप मोठ्या प्रमाणात वापरला जाणारी मशीन आहे.पीक घरात येईपर्यंत मशागत पेरणी करण्यापासून ते पिकाची वाहतूक करण्यापर्यंत ही सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करता येतात. ट्रॅक्टर मुळे पूर्ण दिवसाचे होणारे काम हे फक्त काही तासांमध्येच होते त्यामुळे वेळेची बचत होते पैशाची पण बचत होते परंतु जर नवीन ट्रॅक्टर घ्यायचा म्हटलं तर त्यासाठी खूप खर्च येतो पण आता चिंता करण्याची काहीच गरज नाही कारण महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेती संबंधित सर्व अवजारे आणि यंत्र इतर घटकासाठी अनुदान देत आहे यामुळे शेतकऱ्यांना यंत्र अवजारी घेण्यासाठी मदत होणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे ही खालील प्रमाणेआहेत.
- आधार कार्ड
- आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते
- मोबाईल नंबर
- जमिनीचा सातबारा आठ अ उतारा
महाराष्ट्र कृषी विभाग म्हणजेच कृषी यांत्रिकीकरण योजना / राज्य कृषी यंत्रिकीकरण योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयोगी अवजारे यंत्र आणि इतर साधने शेतकऱ्यांना अनुदानावर दिले जातात. योजनेमधून ट्रॅक्टर या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर या पोर्टल वरती फॉर्म भरावा लागेल. शेतकरी घरबसल्या मोबाईल वरून किंवा ऑनलाईन सेतू सुविधा केंद्र वर जाऊन फॉर्म भरू शकतात.
अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्यांनी दिलेल्या मोबाईल नंबर वरती एसएमएस येईल तसेच योजनेमध्ये निवड झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला संदेश पाठविला जाईल.
ट्रॅक्टर साठी शासनाकडून अनुदान किती मिळते आणि अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात ते खालील प्रमाणे.
महाडीबीटी पोर्टल वरील ट्रॅक्टर या घटकासाठी शासनाकडून खालील प्रमाणे अनुदान दिले जाते प्रत्यक्ष अनुदानामध्ये काही बदल होऊ शकतो.
2WD / 4WD ट्रॅक्टर 8 बीएचपी ते 20 बीएचपी पर्यंत असेल तर,
सर्वसाधारण प्रवर्गाला | अनु. जाती अनु. जमाती प्रवर्ग शेतकरी महिला अल्पभूधारक शेतकरी बहुभूधारक |
75 हजार रुपये पर्यंत | एक लाख रुपये पर्यंत मदत मिळू शकते |
2WD / 4WD ट्रॅक्टरची क्षमता 20 बीएचपी ते 40 बीएसपी पर्यंत असेल तर,
सर्वसाधारण प्रवर्गाला | अनु. जाती अनु. जमाती प्रवर्ग शेतकरी महिला अल्पभूधारक शेतकरी बहुभूधारक |
एक लाख रुपये पर्यंत मदत मिळते. | एक लाख 25 हजार रुपये पर्यंत मदत मिळते. |
2WD / 4WD ट्रॅक्टरची क्षमता ४० बीएचपी ते ७0 बीएसपी पर्यंत असेल तर,
सर्वसाधारण प्रवर्गाला | अनु. जाती अनु. जमाती प्रवर्ग शेतकरी महिला अल्पभूधारक शेतकरी बहुभूधारक |
एक लाख रुपये पर्यंत मदत मिळते. | एक लाख 25 हजार रुपये पर्यंत मदत मिळते. |
कृषी यंत्र व अवजारे यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान यादी येथे पहा.