पेट्रोल petrol आणि डिझेल हा सर्वसामान्य मिडल क्लास माणसाच्या अगदी जवळचा विषय आहे पेट्रोल डिझेलच्या किमतीवरून राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात महागाई वाढली की कमी झाली याचा अंदाज अचूक लावता येतो.
आज दिनांक 14 ऑगस्ट 2024 साठी पेट्रोल आणि डिझेलचे तर जाहीर करण्यात आले आहेत. देशातील अनेक तेल कंपन्या रोजची रोज डिझेल आणि पेट्रोल यांच्या किमतीची माहिती सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करून देतात
त्याचप्रमाणे आज दर कसे बदलले ते जाणून घेण्यासाठी घेण्यासाठी भारत पेट्रोलियम हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल यांसारख्या देशातील प्रमुख सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांकडून इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात. या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात जर तुम्ही चार चाकी किंवा दुचाकी वाहनाने रोज प्रवास करत असाल तर घरातून बाहेर पडताच सर्वप्रथम वाहनात पेट्रोल किंवा डिझेल आहे की नाही याची खात्री करता शिवाय त्याची किंमतही मोजावी लागते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासावे.
अनेक जणांना हा निर्णय राज्यात येणाऱ्या विधानसभा इलेक्शनच्या अगोदर शासनाने घेतलेला आहे असे अंदाज लावत आहेत.