मिळणार सोयाबीन कापूस अनुदान, यादी जाहीर.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

2024 सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेअंतर्गत अनुदान वाटपासाठी महत्त्वाचे कागदपत्रे आणि त्यांची प्रक्रिया सुरू ती खालील प्रमाणे.

साल 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टर 5000 रुपये इतके अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज राज्याचे कृषिमंत्री श्री धनंजय जी मुंडे यांच्या कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती माध्यमांशी त्यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केल्या आहे सन 2023 मध्ये बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव खूप कमी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळेच राज्यातील सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसाह्य करण्याचे लोकसभा निवडणुकीच्या आधीच घोषित केले होते त्याचबरोबर त्यांची अधिकृत घोषणा मांडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आली होती कृषी विभागाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी केली असून राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादित प्रती हेक्टर 5000 रुपये याप्रमाणे अर्थसाह्य देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण 1548 कोटी 34 लक्ष रुपये इतका तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2646 कोटी 34 लक्ष रुपये असा एकूण 4194 कोटी 68 लाख रुपये इतका निधी खर्चास मान्यता राज्य सरकारने देण्यात आली आहे. या अनुदानासाठी ईपीक पाहणी पोर्टल द्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानास पात्र ठरणार असून डीबीटी द्वारे थेट शेतकऱ्यांच्या सलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे या निर्णयामुळे राज्यात मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात लाभ मिळणार आहे.

Leave a Comment